चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, तरुणाला अटक

चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, तरुणाला अटक

Published on

लोणावळा, ता. २५ : चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना लोणावळा शहरात घडली.
श्रीपती महादेव गायकवाड (रा. साने चौक, चिखली) असे नराधमाचे नाव आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडित मुलगी (वय ११) सोमवारी (ता.२४) जयचंद चौकाजवळून जात असताना श्रीपती याने तिला चॉकलेट आणि शीतपेयाचे आमिष दाखवत विनयभंग केला. तसेच सोबत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक तरुणांनी हटकल्याने आरोपीचा प्रयत्न उधळला गेला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीवर भारतीय न्याय संहिता १३७ (२), ६२, पोस्को १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रमेश भिसे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com