लोणावळ्यात डॉक्टरच्या बंगल्यावर पुन्हा दरोडा; साडेअकरा लाख लंपास
लोणावळा, ता.२७ : लोणावळा पोलिस ठाण्याच्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यात पुन्हा एकदा पडलेल्या दरोड्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता.२७) मध्यरात्री वीस ते बावीस दरोडेखोरांनी खंडेलवाल यांच्यासह चौघांना मारहाण करत जवळपास ११ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी तरुण खंडेलवाल (वय ५८, रा. वर्धमान इन्क्लेव्ह, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या खोंडगेवाडी प्रधान पार्क येथील ओम श्री बंगल्यात अनोळखी वीस ते बावीस जणांनी तलवार, कुकरी आदी हत्यारांनिशी दरवाजांचे कडीकोयंडे तोडून प्रवेश केला. कुकरीचा धाक दाखवून रखवालदार अंबादास रामदास रायबोने व त्यांची पत्नी वर्षा यांचे हातपाय बांधले. त्यानंतर खंडेलवाल यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडून त्यांचेही हातपाय बांधले. सोने-चांदी, हिऱ्यांचे दागिने, पंचवीस हजार रुपयांची रोकड असा ११ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. घटनास्थळी आलेल्या खंडेलवाल यांच्या पुतण्यावर दगडफेक करत दरोडेखोर जीप घटनास्थळी सोडून पसार झाले. चार वर्षांपूर्वी डॉ. खंडेलवाल यांच्या याच बंगल्यात दरोडा पडला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

