लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल बंगल्यावर पुन्हा दरोडा

लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल बंगल्यावर पुन्हा दरोडा
Published on

लोणावळा, ता.२७ : लोणावळा पोलिस ठाण्याच्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील प्रसिद्ध डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यात पुन्हा एकदा पडलेल्या दरोड्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता.२७) मध्यरात्री वीस ते बावीस दरोडेखोरांनी कुकरी, तलवारी यासारख्या घातक हत्यारांची बंगल्यात प्रवेश करत डॉ. खंडेलवाल यांच्यासह चौघांना मारहाण करत जवळपास ११ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी तरूण खंडेलवाल (वय ५८, रा. वर्धमान इन्क्लेव्ह, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या खोंडगेवाडी प्रधान पार्क येथील ओम श्री बंगल्यात अनोळखी वीस ते बावीस जणांनी तलवार, कुकरी आदी हत्यारांनिशी बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वार, मुख्य दरवाजाचे लोखंडी ग्रील आणि बेडरूमच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडून बंगल्यामध्ये प्रवेश केला. बंगल्याच्या व्हरांड्यात झोपलेले रखवालदार अंबादास रामदास रायबोने यास कुकरीचा धाक दाखवून त्यांना दांडक्याने मारले. त्यांचे व त्यांची पत्नी वर्षा रायबोने यांचे कपड्याने हातपाय बांधले. त्यानंतर खंडेलवाल यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडत त्यांनाही मारहाण करुन हातपाय बांधले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत बंगल्यातील सोने-चांदीचे व हिऱ्यांचे दागिने, पंचवीस हजार रुपयांची रोकड मिळून ११ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.

जीपमधून आले...
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २० ते २२ दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोर हे एक पीकअप जीपमधून आले होते. दरोड्याचा माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आलेल्या खंडेलवाल यांच्या पुतण्यावर दगडफेक करत दरोडेखोर जीप घटनास्थळी सोडत पसार झाले.

चार वर्षांपूर्वीही दरोडा
चार वर्षांपूर्वी डॉ. खंडेलवाल यांच्या याच बंगल्यात दरोडा पडला होता. यावेळी कोट्यवधी रुपयांची रोकड व दागिने दरोडेखोरांनी लंपास केली होती. काही दरोडेखोरांना पकडण्यास पोलिसांना यश आले होते. मात्र, पूर्ण ऐवज हाती लागला नाही. दीड महिन्यापासून बंगल्याची रेकी करत दरोड्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com