गुहागरच्या पर्यटकाचा दहिवलीमध्ये खून
लोणावळा,ता.२७ : केवळ वाहन वळविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पर्यटनासाठी आलेल्या गुहागरमधील एका तरुणाचा दहिवली येथे खून झाल्याची धक्कादायक घटना घटना घडली. तर दोन पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. गुहागर, रत्नागिरी) असे खून झालेल्या पर्यटकाचे नावे आहे. तर मनोज मधुकर वरवटकर (वय ४२), प्रज्वल उदय मेहता (वय २६, दोघे रा.गुहागर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत मनोज वरवटकर यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निकेश कांबिरे (रा. कर्जत, रायगड), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (दोघे रा. वेहेरगाव, मावळ), गौरव संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांच्यासह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत धोपावकर हे रविवारी (ता.२५) आपल्या मित्रांसोबत वेहेरगाव, कार्ला येथे एकवीरा देवीचे दर्शनासाठी आले होते. सायंकाळी कार्ला फाटा परिसरातील दहिवली गावाजवळ वाहन वळविण्याच्या कारणावरून पर्यटक आणि स्थानिक तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी लोखंडी गज, दांडके, वायपर घेत पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात धोपावकर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. उपचादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

