किरकोळ वादातून एकाचा खून, एक अटकेत

किरकोळ वादातून एकाचा खून, एक अटकेत

Published on

लोणावळा, ता.०३ : पवन मावळातील ठाकूरसाई येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. दिनेश लक्ष्मण गरवड (वय ३६, रा. भाजे, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी प्रणव विश्वजित डेका (वय १८, रा. चव्हाण नगर, वडगाव मावळ, ता. मावळ) यास अटक करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील ठाकूरसाई येथील कुबेर व्हिला बंगलो येथे गुरुवारी (ता.०३) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मयताचा भाऊ ज्ञानेश्वर लक्ष्मण गरवड यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दिनेश व आरोपी प्रणव डेका हे एकाच ठिकाणी बंगल्यावर माळीकामास होते. गुरुवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. यात प्रणव याने दिनेश याच्या डोक्यात लोखंडी कुदळ मारत त्याचा खून केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत आवारे हे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com