व्हीपीएस प्राथमिक विद्यालयात 
बालगोपाळांचा रंगला पालखी सोहळा

व्हीपीएस प्राथमिक विद्यालयात बालगोपाळांचा रंगला पालखी सोहळा

Published on

लोणावळा, ता. ५ : विद्या प्रसारिणी सभेच्या व्हीपीएस प्राथमिक विद्यालयात विठुनामाचा जयघोष करत बालगोपाळांचा पालखी सोहळा रंगला. आषाढी एकादशीनिमित्त शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. व्हीपीएस हायस्कूलचे प्राचार्य सुहास विसाळ, इंग्लिश टिचिंग स्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोटे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत नामदेव, समर्थ रामदास, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत जनाबाई या संतांच्या वेशभूषा करून विद्यार्थी आले होते. मुख्याध्यापिका मंगल जाधव यांनी वारीची माहिती, आपली मराठी संस्कृती याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मनिषा जरग, सुनिता वरे, कविता पंगुडवाले, संगिता पाटील, प्राजक्ता दिवसे, स्वप्नाराणी भालेराव, संजय भालचिम, प्रकाश पाटील, हनुमंत शिंदे, अमित रसाळ, जयश्री बागलकोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुनिता वरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com