
भाऊ म्हाळसकर : सकाळ वृत्तसेवा
लोणावळा, ता. १९ : खंडाळा स्थानकावर तांत्रिक कारणासाठी थांबणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या पर्यटननगरी लोणावळ्यात थांबत नाहीत. कोरोनापूर्वी पुणे-मुंबई या ‘अप’ मार्गावर मेल (एक्स्प्रेस) गाड्या थांबायच्या. आता , नियम दाखवून काही गाड्यांचा लोणावळ्यातील थांबा रद्द करण्यात आला. या गाड्या लोणावळ्यात थांबवाव्यात, अशी मागणी प्रवासी आणि व्यावसायिकांमध्ये जोर धरीत आहे.
पुणे-मुंबई मार्गावरील लोणावळा हे मध्यवर्ती स्थानक आहे. ब्रिटिश काळापासून लोणावळा व खंडाळा ही या मार्गावरील प्रमुख स्थानके मानली जातात. पुण्याकडे येणारी प्रत्येक गाडी लोणावळा स्थानकावर, तर मुंबईकडे जाणारी लांब पल्ल्याची प्रत्येक गाडी खंडाळ्यात तांत्रिकदृष्ट्या थांबते. कोरोनापूर्वी सर्व गाड्यांना लोणावळ्यात थांबा होता. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा सुरू झाली. आता मुंबईकडे जाणाऱ्या सोळा एक्स्प्रेस गाड्यांना अद्यापही लोणावळ्यात थांबा देण्यात आलेला नाही. कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, कन्याकुमारी एक्स्प्रेस, पुणे - भुसावळ एक्स्प्रेस, पुणे-कर्जत शटल या गाड्याही पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
---
खंडाळ्यात तांत्रिक थांबा
खंडाळ्यात तांत्रिक थांबा असल्याने गाड्या तेथे थांबतात. त्यामुळे लोणावळ्यात येणाऱ्यांची गैरसोय होते. लोणावळ्यात अनेक महत्त्वाची ठिकाणे, पर्यटन केंद्रे, रिसॉर्ट्स आहेत. अनेक प्रवासी गाडीसाठी लोणावळा स्थानकावर येतात. पण येथे गाडी थांबत नाही हे समजल्यावर त्यांना खंडाळ्याला जावे लागते. याशिवाय लोणावळ्यात गाडी थांबत नसूनही गाडीचा वेग थोडा कमी झाल्यानंतर उतरताना अनेक जण जखमी झाले आहेत. खंडाळा रेल्वे स्थानकही असुविधेच्या गर्तेत आहे. तेथे रहदारी फारशी नसते. प्रवाशांच्या दृष्टीने ते धोकादायक आहे.
---
व्यावसायिकांसमोर जगण्याचा प्रश्न
लोणावळा रेल्वे स्थानकावर मेल एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने स्थानकावरील व्यावसायिकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फलाट ओस असल्याने स्थानकावरील चिक्की व्यावसायिकांसह फलाटावरील हमालांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
--
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशात ‘डेस्टिनेशन वेडिंग’ला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली होती. लोणावळा हे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ मुख्य केंद्र आहे. या निमित्ताने देशभरातून येथे नागरिक अनेक नागरिक, पर्यटक येतात. रेल्वेच्या प्रतिकूल धोरणामुळे येथील पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे.
- ललित सिसोदिया, रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते
---
तांत्रिक कारणामुळे काही गाड्या स्थानकावर थांबत नाहीत, गाड्या सुरू करणे व थांबविणे हे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात
- बी. एस. राजपूत, स्टेशन प्रबंधक, लोणावळा
---
लोणावळा स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही
(कंसात गाडी क्रमांक)
- सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई (१२२२०)
- चेन्नई सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई (२२१६०
- सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूर (२२२२६)
- यशवंतपुर - बिकानेर एक्स्प्रेस (१६५८७)
- कोइमतूर - लोकमान्य टिळक कुर्ला एक्स्प्रेस (११०१४)
- चेन्नई सेंट्रल - एकतानगर एक्स्प्रेस (२०९१९)
- नागरकोईल - मुंबई एक्स्प्रेस (१६३४०)
- मदुराई - मुंबई एक्स्प्रेस (२२१०२)
- बंगळूर - अजमेर गरीबनवाज एक्स्प्रेस (१६५३२)
- हैदराबाद - मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस (१२७०२)
- कोइमतूर-राजकोट एक्स्प्रेस (१६६१४)
तिरुनवेल्ली - दादर चालुक्य एक्स्प्रेस (११०२२)
- सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस (१२११६)
- लातूर - मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२१०८)
- पुणे - जयपूर एक्स्प्रेस (२०६६७)
- पुणे-जयपूर एक्स्प्रेस (रविवार व बुधवार)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.