‘द्रुतगती’वर वाहतूक नियम तोडणारे कचाट्यात
लोणावळा, ता. १९ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या जवळपास २७ लाख ७६ हजार वाहनांवर दंड ठोठावण्यात आला आहे. यात तब्बल ४७० कोटी रुपयांचे ई-चलन जारी करण्यात आले आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या (आयटीएमस) मदतीने गेल्या वर्षभरात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दंडापैकी ५१ कोटी ३२ लाखांची वसुली झाली आहे.
द्रुतगती मार्गावर कारसाठी १०० किमी प्रतितास आणि अवजड वाहनांसाठी ८० किमी प्रतितास वेगमर्यादा आहे. तर खंडाळा घाट विभागात हीच वेगमर्यादा कारसाठी ६० किमी प्रतितास व अवजड वाहनांसाठी ४० किमी प्रतितास आहे.
सुमारे ९५ किलोमीटच्या द्रुतगती मार्गावर नियमांचे पालन व्हावे आणि अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चलित कॅमेरे आणि डिटेक्शन टूल्स असलेली ‘आयटीएमएस’ प्रणाली राज्य सरकारने जुलै २०२४ पासून कार्यान्वित केली आहे.
खंडाळा घाट विभागात सर्वाधिक दंड
लोणावळा, खंडाळा ते खालापूर हा १० किलोमीटर उतार असलेल्या खंडाळा घाट विभागात सर्वाधिक दंड आकारला गेला आहे. दरम्यान, बोरघाटातील प्रवास अगोदरच मंदगतीने होत आहे. त्यातच वाढत्या दंडामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
एका चलनापोटी ६५५ रुपये ठेकेदाराला
गेल्या वर्षी १९ जुलै ते ३१ डिसेंबरदरम्यान ८ लाख ८४ हजार ई-चलन जारी करण्यासाठी ‘आयटीएमएस’ ऑपरेटर प्रोटेक सोल्युशन्स एलएलपी कंपनीला ५७.९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या ऑपरेटरला प्रत्येक ई-चलन जारी करण्यासाठी ६५४.९० रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूकदार के.व्ही. शेट्टी यांनी दिली.
‘आयटीएमस’ प्रणालीमध्ये या बाबींचा समावेश
४० गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही
स्पीड डिटेक्शन कॅमेरे
ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन
वेट-इन-मोशन सेन्सर्स
वाहन वर्गीकरण प्रणाली
हवामान सेन्सर्स आणि डायनॅमिक मेसेजिंग सिस्टम
सेंट्रल कमांड अँड कंट्रोल सेंटर (सीसीसी)
वाहनाचा प्रकार आणि ई-चलन संख्या
कार - १७.२० लाख
अवजड मालवाहतूक वाहने - ३.२७ लाख
बस (अवजड प्रवासी वाहने) - २.४८ लाख
टॅक्सी - २ लाख
हलकी मालवाहतूक वाहने - १ लाख २० हजार
मध्यम मालवाहतूक - ८५ हजार ४६८
आर्टिक्युलेटेड ट्रक - ३० हजार ४५०
बस (मध्यम प्रवासी वाहने) - १४ हजार ७६४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.