पिंपरी-चिंचवड
तुंगार्लीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
लोणावळा, ता. ४ : तुंगार्ली गावातील ओंकार तरुण मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८७ सदस्यांनी रक्तदान केले.
गणेशोत्सवाचे औचित्य साधत मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले होते. मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर येवले आणि सदस्यांच्या प्रयत्नातून शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले. पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे, माजी नगरसेविका गौरी मावकर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असा संदेश दिला. याचबरोबर रत्ननिधी ट्रस्ट मुंबई व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने मंडळाने गरजू लोकांसाठी मोफत मॉड्युलर हात व पाय वाटप करण्यात येत असून गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.