लोणावळ्यात १ डिसेंबरला 
शाळांना ११ नंतर सुट्टी जाहीर

लोणावळ्यात १ डिसेंबरला शाळांना ११ नंतर सुट्टी जाहीर

Published on

लोणावळा, ता. ३० : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ डिसेंबर रोजी शाळांना सकाळी ११ नंतर सुट्टी देण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक साबळे यांनी या संदर्भातील परिपत्रक सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना पाठवले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्राची तयारी, साहित्य वाटप आणि कर्मचारी नियुक्ती यांसाठी शाळांची इमारत व जागा आवश्यक असल्याने १ डिसेंबर रोजी सकाळी शाळा सुरू राहतील, मात्र सकाळी ११ वाजल्यानंतर सर्व शाळांना सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य व कर्मचारी वेळेत पोहोचावेत यासाठी सर्व शाळांनी सहकार्य करण्याची विनंती आदेशात करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने सकाळी ११ नंतर शाळा बंद ठेऊन निवडणूक संबंधित कामकाजासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी शाळांनी निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com