लोणावळ्यात दोन जागांवरील मतदान स्थगित

लोणावळ्यात दोन जागांवरील मतदान स्थगित

Published on

लोणावळा, ता. ३० : लोणावळा नगर परिषद निवडणुकीत दोन प्रभागांतील दोन जागांवर होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यात गवळीवाडा प्रभाग क्रमांक १० (अ) मधील मागास प्रवर्गाची जागा तसेच नांगरगाव प्रभाग क्रमांक ५ (ब) येथील सर्वसाधारण जागेवरील निवडणूक आता २० डिसेंबरला होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘या दोन्ही जागांवर उमेदवारी अर्ज भरणे तसेच प्रक्रियेतील त्रुटी, न्यायालयीन याचिका संबंधित कारणांमुळे प्रक्रिया काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक आयोगाला काही नगर परिषदांच्या जागांच्या आरक्षणाबाबत फेरविचार करावा लागला आहे. ज्या जागांवर अपील दाखल झाले होते, त्या जागांवरील सार्वत्रिक निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच तेथील मतदान तात्काळ प्रभावाने थांबवण्यात आले आहे.’’
या जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि प्रचार करणे यासह सर्व प्रक्रिया उमेदवारांनी पूर्ण केली होती. मात्र, अचानक आलेल्या या आदेशामुळे सर्व उमेदवारांमध्ये आणि स्थानिक राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपणार आहे. मात्र, काही तास आधीच निवडणूक ढकलण्यात आल्याने आता उमेदवारांचे टेन्शन आणखी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com