लोणावळ्यात विज्ञान प्रदर्शन उत्साहात
लोणावळा, ता. ३ : पुणे जिल्हा परिषद, पुणे (शिक्षण विभाग), मावळ तालुका पंचायत समिती, तालुका मुख्याध्यापक संघ आणि मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा महाविद्यालयात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले.
पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, दत्तात्रेय पाळेकर, दत्तात्रेय येवले, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, दत्तात्रेय चाळक, विठ्ठल माळशिकारे, विकास तारे, सुरेश सुतार आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात सहावी ते बारावीतील ५७ शाळांमधून पर्यावरण, ऊर्जा संवर्धन, आरोग्य, तंत्रज्ञान, जैविक शेती, जलव्यवस्थापन आदी विषयांवर १२० प्रकल्प सादर करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शन, विजेते शाळा व विद्यार्थी
लहान गट (इ. ६ वी ते ८ वी)
प्रथम क्रमांक : हर्ष पिंगळे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, वाहनगाव
द्वितीय क्रमांक : रुद्र इंगुळकर, व्हीपीएस हायस्कूल, लोणावळा
तृतीय क्रमांक : वृषाली संतोष गवई, डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालय, लोणावळा
मोठा गट (इ. ९ वी ते १२ वी)
प्रथम क्रमांक : ओंकार ठुले, आंतरभारती बालग्राम, लोणावळा
द्वितीय क्रमांक : आदिती जाधव, श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे
तृतीय क्रमांक : सार्थक संदीप भालेराव, नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे
दिव्यांग ः लहान गट
प्रथम क्रमांक : आचाल आगीवले, श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, कान्हे
द्वितीय क्रमांक : अथर्व कुटे, नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव
दिव्यांग- मोठा गट
प्रथम क्रमांक : अभय गणेश बेबासे, समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक : समीक्षा संतोष साठे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कान्हे
इतर स्पर्धांचे निकाल
निबंध स्पर्धा : लहान गट : प्रथम- कु. वैष्णवी मच्छिंद्र शेटे (श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे), द्वितीय- वेदांती अविनाश सातकर (श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, कान्हे), तृतीय- गौरी तुकाराम सुतार (पवना विद्यामंदिर, पवना नगर)
मोठा गट : प्रथम- काजल दत्ता दाते (महर्षी कर्वे आश्रम शाळा, कामशेत), द्वितीय- ऋतुजा अरविंद पैठणे (श्री छत्रपती विद्यामंदिर, कान्हे), तृतीय- सहम शिवशंकर जाणा (स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे)
वक्तृत्व स्पर्धा:
लहान गट:
प्रथम – कु. कोमल कैलास मते (श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे)
द्वितीय – कु. प्रांजल प्रवीण गायकवाड (श्री तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे)
तृतीय – कु. आदिती पोवार (व्ही. पी. एस. हायस्कूल, लोणावळा)
मोठा गट:
प्रथम – सृष्टी सुग्रीव बोचरे (इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव दाभाडे)
द्वितीय – इरम शकील तांबोळी (पवना विद्यामंदिर, पवना नगर)
तृतीय – कु. स्नेहल संजय साळवे (छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, कान्हे)
प्रश्नमंजूषा स्पर्धा:
प्रथम क्रमांक : रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक : पु. वा. परांजपे विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे
तृतीय क्रमांक : प्रगती विद्यामंदिर, इंदोरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

