पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ‘सोमनाथ’ सायकल मोहीम
लोणावळा, ता. ३ : पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देत, लोणावळ्यातील सायकल स्वारांनी ७७० किलोमीटरचा खडतर पण प्रेरणादायी प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
लोणावळा सायकलिंग क्लबच्या भरत भरणे, नीतेश कुटे, कैलास कडुसकर, डॉ. प्रवीण पंडित आणि पलाश पंडित या पाच सायकल वीरांचा समावेश होता. या पाच सदस्यांनी लोणावळा ते गुजरातचे सोमनाथ मंदिर हे अंतर सायकलने पार करत सामाजिक जनजागृतीचा नवा आदर्श निर्माण केला.
प्रवासाचा मुख्य उद्देश
‘पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैली’ या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून लोणावळा सायकलिंग क्लब कार्यरत आहे. यावर्षी क्लबने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरापर्यंत हा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला होता. २० डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता लोणावळा ‘झिरो पॉइंट’ येथून प्रवासाला प्रारंभ झाला.
पहिले दोन टप्पे : पहिल्या दिवशी मुंबईमार्गे १७० किलोमीटर पार करत मनोर (पालघर) आणि दुसऱ्या दिवशी १६० किलोमीटर कापून नवसारी गाठले. तिसऱ्या दिवशी हाजरा बंदर गाठल्यानंतर सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास बोटीने केला, जिथे सहप्रवाशांना सायकलिंगचे महत्त्व पटवून देण्यात आले. अंतिम टप्प्यात चौथ्या दिवशी १७० किलोमीटरचे अंतर पार करून जामनगर आणि पाचव्या दिवशी (२४ डिसेंबर) १०० किमी सायकल चालवत हे पथक सोमनाथ मंदिरात दाखल झाले.
भक्ती आणि शक्तीचा संगम
सोमनाथ दर्शनानंतर सायकलस्वारांनी २५ डिसेंबरला द्वारका येथील श्रीकृष्ण मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. २६ डिसेंबर रोजी बडोदा येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट देऊन त्यांनी आपल्या मोहिमेचा समारोप केला. २८ डिसेंबर रोजी सर्व सायकलस्वार सुखरूप लोणावळ्यात परतले. मोहिमेला माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा आणि हॉटेल चंद्रलोकचे मालक यांचे विशेष सहकार्य लाभले.
‘‘केवळ छंद म्हणून नाही, तर आरोग्यासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी सायकल चालवणे ही काळाची गरज आहे, हाच संदेश आम्हाला या मोहिमेतून द्यायचा होता.’’
- भरत भरणे, लोणावळा सायकलिंग क्लब सदस्य
छायाचित्र: LON26B05068/05069
गुजरात: लोणावळा सायकलिंग क्लबचे सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

