पुण्यातून बेपत्ता तरुणाचा मृतदेह लोणावळ्यातील दरीत आढळला

पुण्यातून बेपत्ता तरुणाचा मृतदेह लोणावळ्यातील दरीत आढळला

Published on

लोणावळा, ता.१२ : पुण्यातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (ता.१२) पर्यटनस्थळ लायन्स पॉइंट येथील दरीत आढळला. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सदर मृतदेह सायंकाळच्या सुमारास वर काढला.
विरेंद्र सिन्हा (वय ३२, सध्या रा. बाणेर, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्येबाबत बुधवारी (ता.११) व्हॉट्स ॲपवर स्टेटस ठेवले होते. त्यानंतर तो बेपत्ता होता. मित्रांनी शोध घेऊनही तो सापडला नव्हता. त्यानंतर पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात ‘मिसिंग’ तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, विरेंद्रची मोटार लायन्स पॉइंट येथील वाहनतळावर आढळली होती. तर, तपासणीदरम्यान त्याचे शेवटचे मोबाइल लोकेशन याच परिसरात आढळले. त्यावर पोलिस व बचाव पथकांनी शोधमोहीम राबवली. गुरुवारी (ता.१२) शिवदुर्ग रेस्क्यू टीमने येथील ४०० फूट खोल दरीतही विरेंद्रचा शोध घेतला. कठीण आणि धोकादायक परिस्थितीत सलग पाच तास तपास करत या टीमने विरेंद्रचा मृतदेह शोधला. विरेंद्र हा बाणेर येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com