महाशिवरात्रीनिमित्त नागफणी, सिद्धेश्वराच्या दर्शनास गर्दी
लोणावळा, ता. १५ : रायवूड येथील सिद्धेश्वरासह कुरवंडे गावाजवळील ‘ड्युक्स नोज’ सुळक्याच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या नागफणेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. रायवूड येथे महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीनिमित्त सिद्धेश्वर मंदिरासह परिसरातील महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. लघुरुद्र पठण, महाआरती, पूजा करत विविध धार्मिक कार्यक्रमाचे पार पडले. सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने भाविकासाठी विशेष सोय करण्यात आली होती. याचबरोबर कुरवंडेनजीक नागफणीवरील डोंगरावर वसलेल्या नागफणेश्वर येथे महादेवाच्या पिंडीस फुलांची आरास करण्यात आली होती. उढेवाडी येथे राजमाची किल्ल्याच्या परिसरात दुर्गम ठिकाणी वसलेल्या प्राचीन गोधनेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासून महादेवाच्या पिंडीचे रांगा लावत दर्शन घेतले. ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळा पार पडला. कार्ला येथे ऐतिहासिक तळ्याकाठी वसलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली. येथील शिवशंकर तरुण मंडळाच्या वतीने हरीजागर, महाअभिषेक तसेच फराळ वाटप करण्यात आले. कार्ला येथील शिवशंकर मंदिर येथे मंडळाच्या वतीने सामुदायिक आरती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

