शिव जयंतीनिमित्त लोणावळ्यात ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन
लोणावळा, ता. १८ : जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरमार व युद्धनौकांचे प्रदर्शन, तसेच शिवकालीन सागरी किल्ल्यांची आकर्षक छायाचित्रे यांचा या उपक्रमात समावेश असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक व नगरसेवक निखिल कविश्वर यांनी दिली.
लोणावळा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, शाळा क्र. एक येथे गुरुवार (ता. १९) ते शुक्रवार (ता.२०) दरम्यान सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौसेनेचे जनक’ म्हणून गौरविले जाते. त्यांच्या अद्वितीय आरमार धोरणाची आणि समुद्री सामर्थ्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व उपनगराध्यक्ष देवदास कडू उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक सहभागी होणार आहेत. नागरिकांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

