रायवूड येथे घरात घुसून मारहाण; १६ जणांवर गुन्हा

रायवूड येथे घरात घुसून 
मारहाण; १६ जणांवर गुन्हा
Published on

लोणावळा, ता. १८ : रायवूड परिसरातील बंगल्यातील माळीच्या खोलीत घुसून महिला व तिच्या नातेवाईक महिलेला मारहाण केल्याप्रकरणी तसेच घरातील साहित्य व पाण्याची मोटार, पाइप, केळीची झाडे व इतर झाडांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी १६ जणांसह १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मनीषा मनोहर देशमुख (वय ५२, रा. रायवूड, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजू विरकर, साईनाथ धोत्रे, आम्रपाली सूर्यवंशी, भाग्यश्री कसबे, अयोध्या कांबळे, हेमा गोसावी, सोनाली तुपसुंदर, पल्लवी सोहणे, कामेश्वरी आरमुगम, पंकज शिंदे, सनी भसे, अनिता भडकवाड, वहिता शेख, मंदाकिनी पवार, कल्पना सोनकांबळे आणि वर्षा लोखंडे, तसेच अन्य १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १७) सकाळी साडेसहाच्या सुमारास कुरवंडे ते जुना खंडाळा रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रायवूड लाल चिंमणी बंगल्याच्या परिसरातील माळीच्या खोलीसमोर ही घटना घडली. आरोपींनी माळीच्या खोलीत प्रवेश करून फिर्यादी मनीषा देशमुख व त्यांची जाऊ राजश्री देशमुख यांना हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, महिलांच्या मदतीसाठी आलेले नगरसेवक धनंजय काळोखे यांच्याशी आरोपींनी आरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर कुलकर्णी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com