

लोणावळा, ता. ४ : लोणावळा रेल्वेस्थानक परिसरातील बाजारातील पार्किंगमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बांबू व दगडाने गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी (ता. ३) सायंकाळी टाटा ब्रिजच्या पुढे घडली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी प्रथमेश ऊर्फ पतु कदम याच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर युवराज पाटील (वय ३२, रा. भांगरवाडी, लोणावळा) हे त्यांचे मित्र अनिकेत जाधव व शुभम चौगुले यांच्यासोबत टाटा ब्रिजच्या पुढे चहाच्या टपरीजवळ असताना आरोपी प्रथमेश ऊर्फ पतु कदम व त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घातला. लोणावळा रेल्वेस्थानक परिसरातील पार्किंगमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून आरोपींनी तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर प्रथमेश कदम याने जवळ पडलेला बांबू घेऊन सागर पाटील यांच्या दोन्ही हातांवर मारहाण केली. त्यानंतर दगडाने त्यांच्या उजव्या पायावर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी अनिकेत जाधव यांनाही बांबूने डाव्या हातावर व पायावर मारहाण करून दुखापत करण्यात आली. घटनेनंतर सागर पाटील यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.