‘शेफ्लर इंडिया’मध्ये ६०,५०० बोनस

‘शेफ्लर इंडिया’मध्ये ६०,५०० बोनस
Published on: 

‘शेफ्लर इंडिया’मध्ये ६०,५०० बोनस

‘लुमॅक्स’मध्ये ४४,००० रुपये जाहीर; शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून यशस्वी करार

​लोणावळा, ता. २८ : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे औद्योगिक वसाहतीतील ‘शेफ्लर इंडिया लिमिटेड (इना बेअरिंग) कंपनीतील कामगारांना ६० हजार ५०० रुपये बोनस आणि चाकण औद्योगिक वसाहतीतील ‘लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीतील कामगारांना ४४ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. शिवक्रांती कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यादरम्यान करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली.
वाटाघाटीसाठी संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजयराव पाळेकर, उपाध्यक्ष रवींद्र साठे, कार्याध्यक्ष गुलाबराव मराठे आणि युवा संघटक ॲड. प्रथमेश पाळेकर, कंपनीचे प्लांट हेड पुष्कराज होळकर, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख कृष्णांत पाटील आणि व्यवस्थापक विजय काकडे यांनी विशेष सहकार्य केले.

​लुमॅक्स कंपनीत ४४,००० रुपये बोनस
चाकणमधील ‘लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीतील कामगारांनाही ४४,००० रुपये बोनस जाहीर करून तो जमा करण्यात आला आहे. कामगारांची एकजूट, संघटनेचे प्रयत्न आणि कंपनी व्यवस्थापनाने दाखविलेला सकारात्मक दृष्टिकोन तसेच कामगारांच्या मेहनतीचा, कष्टांचा आणि कंपनीच्या प्रगतीतील योगदानाचा सन्मान म्हणून बोनसच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील समन्वयातून कामगारांच्या हिताचे निर्णय होणे महत्त्वाचे आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात बोनसच्या रकमेत झालेली वाढ कामगारांसाठी दिलासादायक ठरणार आहे, अशी भावना संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजयराव पाळेकर यांनी व्यक्त केली.


छायाचित्र: LON26B06191
लोणावळा : शिवक्रांती कामगार संघटना आणि शेफ्लर इंडिया कंपनी व्यवस्थापनादरम्यान दिवाळी बोनस करारावर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com