बनकर वस्ती येथे 
सांडपाणी महामार्गावर

बनकर वस्ती येथे सांडपाणी महामार्गावर

मोशी, ता. १४ : बनकर वस्ती येथे गेल्या अनेक दिवसांपासून गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी पुणे-नाशिक महामार्गावर वाहत आहे. संजय गांधीनगर येथील गटाराचे पाणी महामार्गाच्या पश्चिमेकडून वाहत बनकर वस्ती पर्यंत येते. तेथून मोरीखालून हे सांडपाणी महामार्गाच्या पूर्वेकडे येऊन रस्त्यावर वाहत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे महामार्गाच्याकडेला असणाऱ्या पूर्व बनकर वस्ती, जांभुळकरनगर, नवचैतन्यनगर येथील स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेत अनेकदा तक्रार करून देखील यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. हे पाणी महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांना देखील याचा त्रास होत आहे. बनकर वस्ती ते बोराटे वस्ती या ठिकाणी पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूस बंदिस्त गटार नसल्याने सतत दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. अनेक वर्षांपासून येथील नागरिक हा त्रास सहन करत आहेत. महामार्ग प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहेत. महामार्ग रुंदीकरण करण्यात येईल तेव्हा हे काम होईल अशा प्रकारची उत्तरे मिळत आहेत. दोन्ही प्रशासनाने समन्वयातून हा प्रश्न मार्गी लावून येथील नागरिकांची दुर्गंधीतून सुटका करावी अशी मागणी संतोष बोराटे, दिलीप सस्ते, गणेश जांभूळकर, संजय बनकर, परमेश्वर आल्हाट यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com