भोसरी, चऱ्होली, मोशीत महाविकास आघाडीचा विजयोत्सव

भोसरी, चऱ्होली, मोशीत महाविकास आघाडीचा विजयोत्सव

मोशी, ता. ४ ः महाविकास आघाडीचे शिरूरमधील विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व बारामतीमधील विजयी उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या यशाबद्दल भोसरी, चऱ्होली व मोशीतील महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला. महाविकास आघाडी जिंदाबाद, असे नारे कार्यकर्त्यांनी यावेळी दिले.
भोसरीतील इंद्रायणीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे निवडून आल्याबद्दल नेहरूनगर येथे त्यांना खांद्यावर उचलून घेत आनंद व्यक्त केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, आप पक्षाच्यावतीने, चऱ्होली बुद्रुक येथे फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भारावून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी वेताळ बुवा चौक, वाघेश्वर महाराज मंदिर पायथ्याशी, तनिष ऑर्किड चौक आझादनगर, तापकीर चौक वडमुखवाडी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, चऱ्होली फाटा, तसेच लक्ष्मीनारायण चौक अशा ठिकठिकाणी आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी अ‍ॅड. कुणाल तापकीर, सुनील पठारे, चेअरमन अप्पासाहेब भोसले, अनिल तापकीर, लक्ष्मण तापकीर, किसन गाडेकर, शरद काटे, दत्तात्रेय बुर्डे, प्रमोद तापकीर, सूरज दाभाडे, अतिश तापकीर, नितीराज कोतवाल, सागर येळवंडे, संतोष तापकीर, अभिषेक पाटील, दिगंबर गरुड, विशाल जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com