इंद्रायणी पुस्तक पेढी सुरू

इंद्रायणी पुस्तक पेढी सुरू
Published on

इंद्रायणी पुस्तक पेढी सुरू
मोशी : इंद्रायणी साहित्य परिषद आणि गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या वतीने मोशी येथे महिलांसाठी इंद्रायणी पुस्तक पेढी सुरू करण्यात आली.
आनंद इंग्लिश मीडियम शाळेच्या मुख्याध्यापिका सरला सोनवणे यांच्या हस्ते या पेढीचे उद्घाटन करण्यात आले. श्री नागेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता गवारे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वंदना आल्हाट, डॉ. स्मिता देशमुख, प्रेमा घारे, संगीता सासवडे, अश्विनी सानपूरकर, श्वेता लहुडकर, रुपाली काळे, श्वेता जाधव, तृप्ती साळी, क्रांती बारस्कर आदी उपस्थित होत्या. साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तेजस्विनी देशमुख यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. सीमा जाधव, कृपाली कालेकर, रसिका सस्ते, शिल्पा फाकटकर, ज्योती हांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. देशमुख यांनी प्रास्ताविक, तर कृपाली कालेकर यांनी सूत्रसंचालन केले.

MOS25B03454

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com