मोशीत पथदिवे बंद, नागरिकांना त्रास

मोशीत पथदिवे बंद, नागरिकांना त्रास
Published on

मोशी, ता. ११ : प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार आणि सहामधील लोंढे उद्यान ते आरटीओ रस्ता या दरम्यान पथदिवे मागील दोन रात्रीपासून बंद आहेत. त्यामुळे अंधार पसरलेला असतो. स्थानिक पादचारी नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक भीतीचे झाले आहे.
सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत येथील लोंढे उद्यानात लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक येथे मोठी गर्दी करत असतात. त्यातच या उद्यानाशेजारील मोकळ्या भूखंडात मोठ्या प्रमाणावर झाडाझुडपे वाढवेली आहेत. येथे साप, घुशी, उंदरांचा अधिवास असल्याने रात्रीच्या वेळी येथील रस्त्याने पायी ये-जा करणे येथील हे पथदिवे बंद असल्याने धोक्याचे ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com