
मोशी, ता. २६ : येथील स्वराज गृहनिर्माण संस्थेच्या समोरील रस्त्यांतर्गत जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर येत असून वाया जात आहे. त्याने पाण्याची नासाडी होत आहे.
जलवाहिनीमधील पाणी रस्त्यावर येत आहे. त्याने पाण्याची टंचाई भासण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्यावर पाणी साचल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्वरित समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी विजय आवटे, महेंद्र सोनवणे, आदित्य भागवत, मंगला दिवेकर, पूर्वा उनवणे आदी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
MOS25B03715
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.