‘ट्रेक फ्रेंडस’कडून श्रीखंड महादेव यात्रा पूर्ण

‘ट्रेक फ्रेंडस’कडून श्रीखंड महादेव यात्रा पूर्ण

Published on

मोशी, ता. ५ : हिमाचल प्रदेशातील सुमारे ५२३० मीटर उंचीवरील अत्यंत कठीण आणि श्रद्धेने परिपूर्ण अशा श्रीखंड महादेव यात्रेचा संकल्प ॲटलास कॉप्को कंपनीतील ट्रेक फ्रेंड्स ग्रुपने नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला. पवित्र पंच कैलासांपैकी एक असे हे शिवशिखर गाठताना समर्पण, शिस्त आणि श्रद्धेच्या बळावर गिर्यारोहकांनी हा आध्यात्मिक पर्वतारोहणाचा अनुभव घेतला.
या यात्रेत ट्रेक फ्रेंडस् ग्रुपचे अमित रैना, सुनील रणपिसे, अभय पांडे, सूरज जाधव, अतुल दिवेकर, महेश टिपरे, किरण वाघ आदी एकूण १५ सदस्यांनी सहभाग घेतला. देशाच्या पवित्र पंच कैलासांपैकी एक असलेल्या श्रीखंड महादेव यात्रेला अत्यंत खडतर मानले जाते. सुमारे ३५ ते ४० किलोमीटरचा खडतर चढ, हिमवर्षाव, विरळ ऑक्सिजन आणि उणे तापमान अशा प्रतिकूल परिस्थितीत ही यात्रा पार केली जाते. तेथील नैसर्गिक शिवलिंग हजारो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.
या ग्रुपने यापूर्वी मणीमहेष कैलास (हिमाचल प्रदेश) आणि आदीकैलास (उत्तराखंड) या पंच कैलासांपैकी दोन यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. अशा प्रकारे या गिर्यारोहकांनी आता तीन पवित्र कैलास यात्रा पूर्ण करत आध्यात्मिक पर्वतारोहणाच्या दिशेने पुढची पायरी गाठली आहे.

या यात्रेने सहभागी सदस्यांना आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. आयुष्यातल्या खऱ्या शांततेचा शोध त्यामध्ये सापडला. श्रीखंड महादेव यात्रा ही प्रत्येकाने किमान एकदा तरी अनुभवावी.
- अमित रैना, सदस्य, ट्रेक फ्रेंडस् ग्रुप, ॲटलास कॉप्को

ही एक पर्वतारोहणाची मोहीम नसून स्वतःच्या अंतर्मनाशी जोडणारा एक दिव्य प्रवास आहे. तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायक आहे. श्रद्धा, चिकाटी आणि एकजुटीचा उत्तम आदर्श पाहायला मिळाला.
- सुनील रणपिसे, सदस्य, ट्रेक फ्रेंडस् ग्रुप, ॲटलास कॉप्को

MOS25B03739

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com