देशी, आयुर्वेदिक झाडांचे आंबेगाव तालुक्यात रोपण
मोशी, ता. ४ : भूगोल फाउंडेशनतर्फे आंबेगाव तालुक्यातील पेठ जवळील डोंगरावर निसर्गरम्य परिसरात व कारेगावच्या शाळेच्या पटांगणात रविवारी (ता.२७) विविध देशी व आयुर्वेदिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.
भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते भानुदास कराळे, बाळासाहेब कराळे यांच्या मार्गदर्शनाखालील हा कार्यक्रम झाला. इंद्रायणी सेवा संघाचे विठ्ठल वीर, प्रा. लक्ष्मण वाळुंज, एकनाथ फटांगडे आदी उपस्थित होते. सातगाव पठार परिसरातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये देशी व आयुर्वेदिक वृक्ष कदंब, कांचन, तामण, आपटा, अर्जुन, कुडा, करंज, वड, पिंपळ, मोहगनी, चिंच, कडुलिंब, बकुळ, औदुंबर, पळस, जांभूळ, आंबा असे २२५ वृक्ष लावण्यात आले. उद्योजक सुनीता बिरादार यांनी पाच हजार रूपयांचे तर अनिल पोवार यांनी २५ वृक्षदान केले.
MOS25B03808