मोशी - जाधववाडी (प्रभाग क्र.२)

मोशी - जाधववाडी (प्रभाग क्र.२)

Published on

प्रभाग २ ः मोशी- जाधववाडी

नव्या सोसायट्या,
नवे मतदार

- श्रावण जाधव
मो शी-जाधववाडी प्रभागामध्ये पारंपरिक मतदारांसोबतच नव्याने वसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नव्या सोसायट्यांचा कल निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. हाउसिंग सोसायट्या आणि शैक्षणिक पट्टा प्रभागात समाविष्ट आहे. सोसायट्यांमुळे २५ ते ३० हजार नवे मतदार वाढले आहेत. यापैकी मोठा वर्ग आयटी, सेवा व व्यवसाय क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांचा मतदानाचा कल पारंपरिक पक्षांपेक्षा विकासाभिमुख उमेदवारांकडे राहण्याची शक्यता आहे. नव्या निवासी वसाहतींचाही मतदार संख्या वाढीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.


समाविष्ट भाग
चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, वुडस व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी आदी.

पक्षीय स्थिती
- भारतीय जनता पक्षाकडून आरोग्य सुविधा, स्मार्ट सिटी, रस्ते, पाणी आणि वाहतूक सुलभता या मुद्द्यांवर जोर
- राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात उमेदवार ठरविण्यावरून गोंधळ
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडूनही सोसायट्यांमधील मतदार, काही समाजघटकांमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

दृष्टीक्षेपात....
- भाजपचा प्रचार संघटन मजबूत
- गेल्या पाच वर्षांपासूनची उमेदवारांची तयारी
- राष्ट्रवादी गटांमध्ये उमेदवार मिळविण्यासाठी स्पर्धा
- शिवसेनेला नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- पारंपरिक मतदारांसोबतच सोसायट्यांतील नागरिकांची भूमिका निर्णायक राहणार
- विकासकामे, सोसायट्यांचे प्रश्न, नागरी सुविधा, वाहतूक कोंडी, प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवरच प्रचाराचा कल अवलंबून राहील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com