मोशी प्राधिकरणात दोन दिवस पाणीपुरवठा खंडित
मोशी, ता. ५ : प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४ आणि ६ येथील ट्रॅफिक पार्क ते आरटीओ दरम्यानच्या रस्त्यावर केबल टाकण्यासाठी खोदकाम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने रस्त्यालगतच्या निवासी घरे आणि सोसायट्यांच्या जलवाहिन्या तुटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सलग दोन दिवस पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला.
महावितरणकडून जेसीबीच्या साहाय्याने हे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, ऐन पाणीपुरवठ्याच्या वेळीच हे नळजोड तुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्यानेही नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. तर हे पाणी वाया जाऊ नये म्हणून पाणी पुरवठा बंद केल्याने परिसरातील अन्य सोसायट्यांनाही पाणी पुरवठा न झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. या अरुंद रस्त्यावर खोदकामातील मातीचे ढिगारे दोन दिवस ठेवल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. परिणामी, येथून ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कोणतीही सूचना न देता आणि योग्य नियोजन न करता केलेल्या खोदकामामुळे आम्हाला नाहक पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
वाहनचालक अजय शिंदे म्हणाले, ‘‘रस्त्यावर मातीचे ढिगारे असल्याने काही वेळ कोंडीत अडकावे लागले. पर्यायी मार्गाचा वापर करावा लागल्याने दैनंदिन प्रवास अत्यंत त्रासदायक झाला आहे. यापुढे महावितरणने योग्य नियोजन करून काम करावे.’’
‘‘संबंधित ठेकेदाराला स्थानिक नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत कल्पना दिली आहे. संबंधित सोसायट्या, घरे यांचे जलवाहिन्यांचे जोड जोडण्याचे काम सुरू असून यापुढे काळजी घेण्याबाबतच्या सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत.
- विक्रांत वरुडे, उपअभियंता, महावितरण, मोशी विभाग
MOS26B04107
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

