उघड्या सांडपाणी वाहिन्या अजूनही वापरात

उघड्या सांडपाणी वाहिन्या अजूनही वापरात
Published on

मोशी, ता. १९ : पुणे-नाशिक महामार्गालगतच्या बनकर वस्ती, बोराटे वस्ती परिसरात भूमिगत सांडपाणी वाहिन्यांऐवजी अद्याप उघड्या वाहिन्या वापरात आहेत. त्याने वाहनचालकांचे अपघात होत आहेत. याशिवाय वाहिन्यांमध्ये साचलेले घाण दुर्गंधीयुक्त पाणी आणि डासांसह विविध समस्यांनी स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.
पुणे - नाशिक या महामार्गाने पादचारी, दुचाकीस्वारांसह भरधाव वेगाने वाहतूक सुरू असते. बनकर वस्ती ते बोराटे वस्ती परिसरातील या उघड्या सांडपाणी वाहिन्यांमध्ये वाहने जाऊन अपघात घडत आहेत. भरधाव वाहनांमुळे उघड्या वाहिन्यांमध्ये पादचारी तसेच दुचाकीस्वार पडून अपघात घडत आहेत. त्यामुळे बनकर वस्ती ते बोराटे वस्ती दरम्यान महामार्गालगत असलेल्या उघड्या वाहिन्या भूमिगत कराव्यात, अशी स्थानिक नागरिक संजय जांभुळकर, दिनेश बोराटे, संतोष बोराटे आदींनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com