मोशी प्राधिकरणातील रस्त्यावर कचरा पडून
मोशी, ता. ४ : मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार व सहामधील संतनगर चौक ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर होळीची राख व कचरा तसाच पडून आहे. स्वच्छता कर्मचारी, कचरावेचक वाहने नियमित येत नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
मोशी प्राधिकरण हा स्वच्छ, सुंदर व आदर्श परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. लोंढे उद्यानात व या रस्त्यावरून रोज सकाळ - संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व घाण सहन करावी लागत आहे. लोंढे उद्यानासमोरही कचऱ्याचे अनेक ढीग आढळून येत आहेत. कर भरूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पहाटे रस्ता झाडून जाणारे स्विपर अनेक दिवसांपासून दिसून एक कर्मचारी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनावर येऊनही कचरा न उचलता निघून जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
आम्ही कर भरतो. पण कचरा उचलायला कोणीच येत नाही. होळीची राख अजूनही तशीच आहे, ही गंभीर बाब आहे.
- प्रसाद पाटील, नागरिक, मोशी
MOS26B04253
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

