मोशी प्राधिकरण परिसराकडे येताना सेवा रस्त्याची गरज
मोशी, ता. ७ : पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या सीमा भिंतीजवळून मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४, ६ आणि ९ या भागांकडे जाण्यासाठी सेवा रस्ता नसल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या भागात विविध गृहनिर्माण संस्था, आरटीओ कार्यालय, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये तसेच पोलिस ठाणे अशी महत्त्वाची कार्यालये असूनही मोडीकडून थेट येण्यासाठी स्वतंत्र सेवा रस्ता उपलब्ध नाही.
मोडीकडून या परिसरात येणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा विरुद्ध दिशेने प्रवास करण्याचा धोका पत्करावा लागतो. अन्यथा सरळ पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौकापर्यंत जाऊन पुन्हा वळसा घालून या परिसरात यावे लागते. या प्रक्रियेमध्ये सुमारे एक ते दोन किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहतूक सिग्नल, वाहतूक कोंडी, वेळेची अपव्यय तसेच इंधनाचा अतिरिक्त खर्च अशा अनेक समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-नाशिक महामार्गालगत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र ते आरटीओ कार्यालय या दरम्यान तातडीने सेवा रस्ता तयार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
या परिसरात रोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येतात. सेवा रस्ता नसल्यामुळे अनावश्यक वळसा घालावा लागतो. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते. प्रशासनाने लवकरात लवकर सेवा रस्ता तयार करणे आवश्यक आहे.
संजय कदम, स्थानिक नागरिक
आरटीओ कार्यालय, पोलीस ठाणे आणि अनेक सोसायट्या या भागात आहेत. सेवा रस्ता झाल्यास वाहतूक सुलभ होईल आणि अपघाताचा धोका देखील कमी होईल.
- प्रशांत पाटील, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

