वडमुखवाडी परिसरात वीजेचा लपंडाव; नागरिक हैराण

वडमुखवाडी परिसरात वीजेचा लपंडाव; नागरिक हैराण

Published on

मोशी, ता. १३ : सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत तसेच कामगारांना नियमित कार्यालयीन वेळेनुसार कामावर जाणे आवश्यक आहे. परंतु वडमुखवाडी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध वेळेत वीज पुरवठा खंडित होत आहे, ज्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.
परिसरात अनेक नव्याने गृहनिर्माण संस्था, गावठाणात नागरी वस्ती वाढत असल्याने हजारो नागरिक येथे वास्तव्यास आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, आयटी अभियंत्यांचा ‘वर्क फ्रॉम होम’, व्यापाऱ्यांचे आर्थिक कामकाज तसेच घरगुती उपकरणे, पाणीपुरवठा, लिफ्ट आणि मोबाईल चार्जिंग प्रभावित होत आहे. विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळेत वीज गेल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते.
अनेक वेळा पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने समस्येची दखल घेऊन नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करावा तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी वडमुखवाडी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


मागील काही दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. विविध कामांसाठी विजेची आवश्यकता असते. काय प्रश्न निर्माण झाला आहे, तो महावितरणकडून जाहिर करणे आवश्यक आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने अचानक वीज गेल्यावर सध्या सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे. तसेच कामगारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- ॲड. विष्णू तापकीर, वडमुखवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com