मोशी प्राधिकरणातील पेठांत पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा

मोशी प्राधिकरणातील पेठांत पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा
Published on

मोशी, ता.३० : गेल्या दोन दिवसांपासून मोशी प्राधिकरणातील पेठ क्र.४, ६ मधील काही भागांत पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. सायंकाळी आलेले पाणी नागरिकांना रात्री उशिरापर्यंत भरावे लागत आहे.
मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, मोशी प्राधिकरणात बैठी घरे, विविध गृहनिर्माण संस्था असून नागरीकरण वाढले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या परिसरात जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले आहे. मोशी गावठाण, शिवाजीवाडी, बोराटे वस्ती, बोऱ्हाडेवाडी, आल्हाटवाडी, सस्ते वाडी, बनकर वस्ती, कुदळेवस्ती, डुडुळगाव आदी भागांत सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. साधारणतः १५ दिवसांपूर्वी मोशी प्राधिकरणातील पेठ क्र.४, ६ मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याची समस्या होती. मात्र, आता पुन्हा एकदा कमी दाबाने तेथे पाणीपुरवठा होऊ लागला आहे. दरम्यान, याबाबत
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता चेतन देवरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.


गेल्या दोन दिवसांपासून आमच्या मोशी प्राधिकरण परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सध्या उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे आतापासूनच हा त्रास सहन करावा लागत आहे.
- अश्विनी बिरादार, मोशी प्राधिकरण

आमच्या परिसरात सायंकाळी पाणी येते. मात्र, सध्या ते अत्यंत कमी दाबाने येते. रात्री उशिरापर्यंत पाणी भरावे लागते. इमारतीवरील पाण्याच्या टाकीमध्ये पाणी चढायला वेळ लागतो.
- सुरेखा दिवेकर, मोशी प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com