मोशी, डुडुळगाव, चऱ्होलीत वीजपुरवठा वारंवार खंडित

मोशी, डुडुळगाव, चऱ्होलीत वीजपुरवठा वारंवार खंडित
Published on

मोशी, ता. २ : गेल्या काही दिवसांपासून मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी परिसरात दररोज दुपारी ४ ते ७ या वेळेत वीज पुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महावितरणकडून त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मार्च-एप्रिल हा शालेय परीक्षांचा महत्त्वाचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर, वीज नसल्यामुळे इंटरनेट सेवा देखील बंद पडत असून ऑनलाइन अभ्यास, कामे आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. याबाबत विद्युत विभागाचे अधिकारी विक्रांत वरुडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
स्थानिक रहिवासी संदीप पाटील म्हणाले, ‘‘दररोज ठरावीक वेळेत वीज जाते. पण, कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. हा प्रकार त्वरीत थांबवावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com