

मोशी, ता. ५ : गेल्या आठवड्यापासून राज्यातील विविध भागांमध्ये गारपीट, पावसाचा तडाखा बसून शेतीमालाचे नुकसान होत आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातून फळे, फळभाज्या आणि पालेभाज्यांची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला आहे. त्यामध्ये कलिंगड, खरबूज, द्राक्षे, नारळ, आंबा आदी रसाळ फळांची त्यात विशेषतः कलिंगड व खरबुजाची आवक २५ टक्क्यांनी वाढली तर कलिंगडाचे १५ ते २० वरून ९ ते १० रुपयांवर व खरबुजाचे भावही २५ ते ३० रुपयांवरून १८ ते २० रुपयांवर येऊन एकूण २५ टक्क्यांनी भाव कमी झाले. पालेभाज्या व फळभाज्यांचीही आवक १० टक्क्यांनी वाढली असून, भावही १० टक्क्यांनी कमी झाले आहेत. यामध्ये शेवगा ७० ते ८० रुपयांवरून ४० ते ५० रुपयांवर, भेंडी ५० ते ६० रुपयांवरून ३५ ते ४० रुपयांवर आले आहेत. कोथिंबीर व मेथी १५ ते २० रुपयांवरून १० ते १२ रुपयांवर आले आहेत.
पालेभाज्यांची एकूण आवक : ५३ हजार ४०० जुड्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर : २९ हजार ४००, मेथी : १० हजार ९००, शेपू : ५००, कांदापात : ३ हजार ३००, पालक : ६ हजार १००, पुदिना : ४ हजार ७०० आदी पालेभाज्यांची एकूण आवक ५३ हजार ४०० जुड्यांची झाली आहे.
पालेभाज्यांचे भाव (एका जुडीचे)
कोथिंबीर : १० ते १२ रुपये, मेथी : १० ते १२, शेपू : ८ ते १०, पालक : ८ ते १०, कांदापात : १० ते १५, चवळी : ५ ते ७,
हरभरा : ८ ते १० पुदीना : ४ ते ५
फळभाजीची एकूण आवक : ४ हजार २९९ क्विंटल
कांदा : ५०८, बटाटा : ६६३, आले : ८२, भेंडी : १५८, गवार : ४१, टोमॅटो : ७०२, मटार : २८, घेवडा : ६६, दोडका : ४०, मिरची : २७०, दुधी : ९१, लाल भोपळा डांगर : ११३, काकडी : २८९, कारली : ३३, गाजर : ११०, फ्लॉवर : ३७९, कोबी : २४४, वांगी : १८०, ढोबळी : ६४, बीट : २३, पावटा : ४, चवळी : ८, शेवगा : ५७, कैरी : ७४, परवर : ६, लिंबू ३७, कढीपत्ता : १३, मका कणीस : ४१ आदी फळभाज्यांची एकूण आवक ४ हजार २९९ क्विंटल झाली.
फळभाज्यांचे भाव (एक किलोचे)
कांदा : १० ते १५, बटाटा : १५ ते २०, लसूण : ८० ते १००, आले : ४० ते ६०, भेंडी : ४० ते ५०, गवार : ४० ते ५०, टोमॅटो : १५ ते २०, मटार : ३५ ते ४०, घेवडा : ३० ते ४०, दोडका : ५० ते ६०, मिरची : ५० ते ६०, दुधी भोपळा : २० ते ३०, लाल भोपळा : १० ते १५, काकडी : १५ ते २०, कारली : ३० ते ४०, गाजर : २० ते ३०, पापडी : ४० ते ५०, फ्लॉवर : १० ते १५, कोबी : ८ ते १०, वांगी : ३० ते ४०, ढोबळी : ४० ते ५०, सुरण : ५० ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, बारीक : ४० ते ५०, बीट : ३० ते ४०, पावटा : ४० ते ५०, वाल : ५० ते ६०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ४० ते ५०, ढेमसे : ५० ते ६०, परवर : ६० ते ७०, भावनगरी : ४० ते ५०, चवळी : ३० ते ४०, रताळी : ५० ते ६०, दोडका : ४० ते ५०, कढीपत्ता : ६० ते ७०, लिंबू : १०० ते ११०, मका कणीस : ७ ते १०
फळबाजारात फळांची एकूण आवक : २ हजार १९ क्विंटल
सफरचंद : २४, मोसंबी : ३२, संत्री : ११, डाळिंब : ४, पेरू : ९७, चिक्कू : ४६, द्राक्षे : ९७, केळी : १०३, खरबूज : २५५, कलिंगड एक हजार १४०, आंबा : ५६, स्ट्रॉबेरी : १, ड्रॅगन : २ आदी विविध प्रकारच्या फळांची एकूण आवक एक हजार ७११ क्विंटल झाली.
फळांचे बाजारभाव (एक किलोचे)
कलिंगड : ९ ते १०, रत्नागिरी हापूस : १ हजार ते १ हजार २०० रुपये डझन, सफरचंद : १२० ते १५०, मोसंबी : ३० ते ५०, संत्री : ५० ते ७० डाळिंब : १३० ते १५०, पेरू : २० ते ३०, द्राक्षे : ७० ते ८०, चिक्कू : २५ ते ४०, केळी : ३० ते ६०, खरबूज : १० ते १५, शहाळे नारळ : २० ते ३०, पेर : १०० ते १२०, अननस : ५० ते ६०, आवळा : ४० ते ५०, ड्रॅगन फ्रूट : १५० ते १८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.