मोशी प्राधिकरणातील पदपथांवर विक्रेत्यांचा कब्जा

मोशी प्राधिकरणातील पदपथांवर विक्रेत्यांचा कब्जा
Published on

मोशी, ता. १० : मोशी प्राधिकरणातील पदपथांना अतिक्रमणांच्या समस्येने ग्रासले आहे. ठिकठिकाणी आंबे विक्रेते, भाजी विक्रेते, दुचाकी गॅरेज, कपड्यांच्या दुकानांचे स्टॉल्स पदपथावर उभे केले असून काही नागरिकांनी तर आपल्या मोटारी थेट पदपथांवर उभ्या केल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी मोशी परिसराचा अत्यंत नियोजनबद्ध आणि दूरदृष्टी ठेवून विकास केला. प्रशस्त स्पाईन रस्ता, अंतर्गत भागांना जोडणारे ३० फुटी रस्ते, आकर्षक रंगीत पेव्हिंग ब्लॉकचे पदपथ, जिल्हा मध्यवर्ती केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पोलिस आयुक्तालय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, विविध क्रीडांगणे व उद्याने यामुळे मोशी प्राधिकरणाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
मात्र सध्या या सुंदर आणि नियोजनबद्ध प्राधिकरणातील पदपथांवर अतिक्रमणे वाढू लागली आहेत. अनेक ठिकाणी विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबे विक्रेत्यांनी पावलोपावली स्टॉल उभारल्याने बहुतांश पदपथ व्यापले गेले आहेत.
यामुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी थेट रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पदपथ मोकळे करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com