घरांसमोरील गतिरोधकामुळे पेठ क्र.४ मधील रहिवासी त्रस्त

घरांसमोरील गतिरोधकामुळे पेठ क्र.४ मधील रहिवासी त्रस्त
Published on

मोशी, ता. १६ : मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४ मधील पीसीएनडीटीए कार्यालयाशेजारी असलेल्या गतिरोधकावरील पांढरे पट्टे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. हे गतिरोधक काही घरांच्या अगदी समोरच असल्याने या घरांतील अबालवृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
घरांच्या अगदी समोरच असल्याने येथून जाणारी जड वाहने वेगाने गतिरोधकावर आदळत जातात आणि त्यामुळे प्रचंड मोठा आवाज निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी ट्रक, डंपर व इतर अवजड वाहनांच्या आवाजामुळे परिसर दणाणून जात आहे. गतिरोधकावरील पांढरे पट्टे दिसत नसल्याने वाहनचालकांना तो लांबून लक्षात येत नाही. काही अवजड वाहन चालक, तर हा गतिरोधक दिसत असूनही त्याच्यावरून वेगाने वाहन पळवतात. त्यामुळे तर आणखी जोरात आवाज होतो.
हा जुना गतिरोधक हटवून पीसीएनडीटीएच्या प्रवेशद्वारासमोर नियमानुसार नवीन गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच नव्या गतिरोधकावर स्पष्ट पांढरे पट्टे मारावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com