

मोशी, ता. २२ : मोशीतील राजा शिवछत्रपती चौक ते अलंकापूरम मार्गे चऱ्होलीकडे जाणाऱ्या मार्गावरील जाळीचा मळा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी, तीनचाकी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
राजा शिवछत्रपती चौक ते रस्त्यावरील पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. मात्र, जाळीचा मळा परिसरापासून अलंकापूरमच्या अलीकडील वळणापर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून पाठीच्या आजाराला निमंत्रण मिळत आहे.
आळंदी, चऱ्होली परिसरातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड शहराकडे ये-जा करण्यासाठी हा मार्ग वेळ व इंधनाची बचत करणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, कामगार, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधी यांचीही या मार्गावरून ये-जा असते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांची अडचण आणखी वाढते. या मार्गाची तातडीने पाहणी करून डांबरीकरण करत खड्डे बुजवावेत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.