पंतप्रधान आवास योजनेतील प्रश्नांवर पालिकेकडे पाठपुरावा

पंतप्रधान आवास योजनेतील
प्रश्नांवर पालिकेकडे पाठपुरावा
Published on

मोशी, ता. १८ : चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील रहिवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या व मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजना विभागाचे प्रमुख बन्सल यांच्यासोबत बैठक घेऊन विविध प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली.
गृहप्रकल्पातील रहिवाशांच्या समस्या, रखडलेली विकासकामे तसेच आवश्यक मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. महापालिकेची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन बन्सल यांनी दिले.
दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले यांच्याशी चर्चा करण्यात आली. परिसरातील पाण्याचा दाब, उपलब्ध पाण्याचे प्रमाण आणि सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पुढील चार ते पाच दिवस पाणीपुरवठ्याचे रीडिंग घेण्यात येणार आहे. पाहणीनंतर आवश्यकतेनुसार नवी जलवाहिनी टाकून नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी गृहप्रकल्पातील निकृष्ट बांधकाम, सदनिकांमधील गळती, अपूर्ण सुविधा तसेच पाणीपुरवठ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. प्रशासनाने तातडीने कामे पूर्ण न केल्यास सर्व सभासदांना सोबत घेऊन महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. योजनेतील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय व पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com