

मोशी, ता. २० : सध्या सर्वत्र पाऊस थांबला आहे. तरीही खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, शिरूर, हवेली आदी बागायत परिसरातून कोथिंबीर, मेथी, शेपू आदी पालेभाज्यांची ५३ हजार ३०० एवढी मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मात्र भाव स्थिर आहेत. तर फळभाज्यांची ४ हजार तर फळांची आवक ६१६ अशी व मागील आठवड्याप्रमाणे आवक आणि भावही सध्या स्थिर आहेत.
मोशीतील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री नागेश्वर महाराज उपबाजारात झालेली शेतमालाची आवक व बाजारभाव ः
- पालेभाज्यांची एकूण आवक : ५५ हजार ३००
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर : २६ हजार ५००, मेथी : १३ हजार, शेपू : १ हजार ८००, पालक : ८ हजार १००, कांदा पात : २ हजार ९००, पुदिना : २ हजार ५००, मुळा : ५०० आदी पालेभाज्यांची एकूण आवक : ५५ हजार ३०० जुड्यांची आवक झाली आहे.
- पालेभाज्यांचे भाव (एका जुडीचे) ः कोथिंबीर : ७ ते १०, मेथी : १२ ते १५, शेपू : १० ते १२, पालक : १० ते १२,
कांदापात : १० ते १२, चवळी : ७ ते ८ पुदिना : ५ ते ५
फळभाज्यांची एकुण आवक : ४ हजार ६५२
कांदा : ६०७, बटाटा : १ हजार २१५, लसूण : १०, आले : ५५, भेंडी : १६५, गवार : ३६, टोमॅटो : ५४६, मटार : ३३, घेवडा : ७९, दोडका : २८, मिरची : १८०, दुधी : ७९, लाल भोपळा डांगर : ९१, भुईमूग शेंग : ५२, काकडी : १८८, कारली : ८१, गाजर : ८४, फ्लॉवर : ३३४, कोबी : २९५, वांगी : १६०, ढोबळी : ११, बीट : १९, पावटा : ६, वाल : १५, चवळी : १६ , शेवगा : ६६, परवर : ३०, घोसाळी :११, लिंबू : ९५, कढीपत्ता : ३०, मका कणीस : १०१, आदी फळभाज्यांची एकुण आवक ४ हजार ६५२ क्विंटल झाली.
फळभाज्या : एकुण आवक : ४ हजार ६५२
- भाव एक किलोचे ः - कांदा : १५ ते १८, बटाटा : १८ ते २२, लसूण : ११० ते १२०, आले : १०० ते ११०, भेंडी : ५० ते ६०, गवार : ४५ ते ५०, टोमॅटो : १० ते १२, घेवडा : ८५ ते ९०, दोडका : ५० ते ६०, मिरची : ७० ते ८०, दुधी भोपळा : ३० ते ४०, लाल भोपळा : २० ते ३०, काकडी : ३० ते ४०, कारली : ३० ते ४०, गाजर : ३० ते ४०, पापडी : ४० ते ५० , फ्लॉवर : १५ ते २०, कोबी : १२ ते १५, वांगी : ४० ते ५०, ढोबळी : ४० ते ५०, सुरण : ५० ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, बारीक : ४० ते ५०, बीट : ३० ते ४०, पावटा : ४० ते ५०, वाल : ५० ते ६०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ६० ते ८०, ढेमसे : ५० ते ६०, परवर : ६० ते ७०, भावनगरी : ४० ते ५०, चवळी : ३० ते ४०, रताळी : ५० ते ६०, दोडका : ४० ते ५०, कढीपत्ता : ६० ते ७०, लिंबू : ५० ते ६०, मका कणीस : ८ ते १०
फळे
- सफरचंद : ३४, मोसंबी : १३०, संत्रा : १३, डाळिंब : २१, पेरु : ८९, पपई : १३, केळी : ११७, नारळ : १८० अननस : ३, किवी : ३ सीताफळ : ७, ड्रॅगन : २२, आवळा : २, फळांची एकुण आवक : ६१६
- बाजारभाव एक किलोचे - सफरचंद : १०० ते १२०, मोसंबी : ५० ते ६०, संत्री : ६० ते ८०, डाळिंब : ९० ते ११०, पेरु : ५० ते ६०, अंजीर : १०० ते ११०, पपई : १५ ते २०, केळी : ३० ते ५०, शहाळे नारळ : ४० ते ५०, ड्रॅगन : ५० ते ६०.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.