रावेत परिसरातील नाल्यांची यंत्राच्या साहाय्याने सफाई

रावेत परिसरातील नाल्यांची यंत्राच्या साहाय्याने सफाई
Published on

रावेत, ता.११ : रावेत परिसरातील नाले सफाईसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. सध्या डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या नाल्यासह इतर नाल्यांची स्पायडर मशिनच्या साहाय्याने सफाई केली जात आहे.
रावेत परिसरात अनेक नाल्यांमध्ये साचलेल्या गाळाने पावसात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आले होते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्थापत्य विभाग आणि आरोग्य विभागाने तत्काळ पावले उचलली आहेत. स्पायडर मशिनद्वारे नाल्यांतील गाळ व कचरा सहजतेने बाहेर काढला जात आहे. विशेषतः जेथे जेसीबीच्या साहाय्याने सफाई करणे शक्य नव्हते, अशा ठिकाणी या यंत्राची मदत अत्यंत प्रभावी ठरली आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून यामुळे डेंगी, हिवताप यासारख्या आजारांचा धोका टळण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे म्हणाले, ‘‘पावसाळ्यापूर्वी महापालिका विविध प्रभागांमध्ये नाल्यांची सफाई करत आहे. काही ठिकाणी मोठ्या यंत्रांची गरज होती. त्यामुळे स्थापत्य विभागाने स्पायडर मशीन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कार्यक्षमता वाढली असून आणखी काही ठिकाणी यंत्राद्वारे सफाई करण्यात येईल.’’


NGI25B00477

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com