पवळे पूल - चिंचवड स्टेशन रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा
निगडी, ता.२ ः कै.मधुकरराव पवळे पूल ते चिंचवड रेल्वे स्थानका दरम्यानचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरून गेला आहे. परिणामी, दररोज वाहतूक कोंडी होत असून सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शिवाय अपघातांची शक्यता वाढली आहे.
या रस्त्याचा उपयोग दररोज हजारो वाहनचालक करत असतात. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे दिसतही नाहीत. काही चालक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चुकीच्या बाजूने जात असतात. त्यामुळे अनेक दुचाकीचालक तोल जाऊन अपघातग्रस्त होत आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांचे हाल होत आहेत.
वाहन चालक सुनीता शिंदे म्हणाल्या, ‘‘या रस्त्याने शाळकरी मुले, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी रहदारी असते. सकाळी मुलांना शाळेला सोडायला जाताना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची भीती वाटते. प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता खड्डेमुक्त करावा.’’
पालिकेचे दळणवळण विभागाचे अभियंता सुनील पवार सांगितले की, हा रस्ता दुरूस्ती आणि देखभालीसाठी मेट्रो प्रशासनाकडे हस्तांतरित केला आहे. मेट्रोचे अधिकारी त्याच्या दुरुस्तीचे काम करत आहे. काही ठिकाणी खड्डे भरण्यासाठी पावसामुळे अडचणी निर्माण होत आहेत. महापालिका प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे. पावसाने उघडीप दिली की पूर्ण रस्ता खड्डे मुक्त केला जाईल.
- सुनील पवार, अभियंता, दळणवळण विभाग, महापालिका
NGI25B00584
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.