रावेतमध्ये पालिकेचे रुग्णालय सुरू करा

रावेतमध्ये पालिकेचे रुग्णालय सुरू करा

Published on

रावेत, ता. ३ : रावेत परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. तसेच नागरिकरण वाढत आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सामान्य नागरिकांना उपचारासाठी थेरगाव किंवा किवळे येथील प्राथमिक उपचार केंद्रात जावे लागते. त्यामुळे चंद्रभागा कॉर्नर परिसरातील सर्व्हे क्रमांक ७६ मध्ये महापालिकेच्या आरक्षणातील जागेवर रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी आमदार शंकर जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे.
रावेत परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक झाले आहे. या परिसरात महापालिकेचे रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना गंभीर आरोग्य सेवेसाठी निगडी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी किंवा पुणे शहरात जावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक वेळा गंभीर प्रसंग ओढावतात. त्यात वृद्ध, लहान मुले, महिला यांना अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे परिसरात प्राथमिक आरोग्य सेवा, तपासणी केंद्र, महिला व बालकल्याण विभाग यांचा समावेश असावा, असेही नमूद करण्यात आले आहे. दीपक भोंडवे, संतोष भोंडवे, श्यामभाऊ बन आदींनी केली आहे.
या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘‘लवकरच महापालिकेच्या आरोग्य विभागाशी समन्वय करून प्रस्ताव सादर केला जाईल,’’ असे आश्वासन दिले.

रावेतमधील चंद्रभागा कॉर्नर परिसरातील सर्व्हे नंबर ७६ मध्ये महापालिकेच्या आरक्षणातील आठ गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात आहे. लवकरच बजेट मंजूर करून पुढील कामे केली जातील.
- चंद्रकांत मुढाळ, कार्यकारी अभियंता, ब प्रभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com