पिंपरी-चिंचवड
‘इनरव्हील’ अध्यक्षपदी दुल्लत
निगडी, ता. १४ ः इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा १४ वा पदग्रहण समारंभात डॉ. कमलजीत कौर दुल्लत यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली; तर सचिव म्हणून दीपाली जाधव यांची नियुक्ती झाली. कार्यकारिणीत ॲड. आरती जाधव (खजिनदार), डॉ. स्वाती देशमुख (आयएसओ), सुनेत्रा राजे मोहिते (संचालक), मंगल गोसावी (क्लब समन्वयक), आरती मुळे, सविता राजापूरकर, जयश्री कुलकर्णी (सल्लागार) यांच्याही नियुक्त्या झाल्या.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ च्या चेअरमन डॉ. आशा देशपांडे उपस्थित होत्या. पूजा सप्रे यांनी सूत्रसंचालन केले; तर माजी अध्यक्ष नीता गुप्ता यांनी आभार मानले.