धार्मिक, सामाजिक उपक्रमांवर भर

धार्मिक, सामाजिक उपक्रमांवर भर

Published on

रावेत, ता. २ ः रावेत परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी यंदा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. विविध सोसायट्यांमधूनही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम
सद्‍गुरु चौकातील श्री शिवछत्रपती मित्र मंडळाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. मंडळाने आरती सोहळे, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच उत्सव काळात स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. सत्यवान भोंडवे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सामाजिक एकतेचे दर्शन
रुणाल गेटवे सोसायटीमध्ये महिला वर्गाकडून अथर्वशीर्ष पठण केले जाते. ज्येष्ठ नागरिकांकडून सकाळची आरती व संध्याकाळची आरती टॉवरनिहाय घेतली जाते. सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी यांनाही आरतीची संधी दिली जाते. सुजीत ठाकरे, संजय आंबवले, अजय बचाले, नितीश वाल्हेकर आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

साधेपणावर भर
ट्रान्सपोर्टनगर येथील अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट असोसिएशन व बालाजी मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित बालाजी राजा सार्वजनिक गणपती मंडळाचा गणेशोत्सव यंदाही भक्तिभावात साजरा होत आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयवंत जाधव असून, कार्याध्यक्ष आलोक सिंग, सचिव बनवारी अग्रवाल आहेत.


मोरपिसांचा देखावा
शिंदे वस्ती येथील भोंडवे एम्पायर सांस्कृतिक मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात मोरपिसांचा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाचे दहावे वर्ष आहे. हिरव्या, निळ्या आणि रंगीबेरंगी मोरपिसांनी सजविलेला हा देखावा गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे. अभय पाटील मंडळाचे अध्यक्ष आहेत.

अष्टविनायक देखावा
गॅलेक्सी को-ऑप. हाऊसिंग सोसायटीने अष्टविनायक गणपतींचा देखावा सादर केला आहे. सोसायटीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह रक्तदान, लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस, महिलांसाठी पाककला-मेंदी, युवकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत.

आकर्षक विद्युत रोषणाई
रावेतमधील शिंदे वस्ती चौकात गणेश मित्र मंडळाच्यावतीने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मोठा आकर्षक देखावा आणि रोषणाईने मंडप उजाळून निघाला आहे.

फुलांची सजावट
ट्रान्सपोर्टनगरच्या असोसिएशन ऑफ ट्रान्सपोटर्सतर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना
सेलिस्टियल सिटी फेज एकमधील गणेश मंडळाने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र लोहोट, सचिव अजित भावे आदींनी संयोजन केले.

शनिवार वाड्याची प्रतिकृती
रावेत येथील हार्मनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या गणेश मंडळाने शनिवारवाड्याची प्रतिकृती सादर केली आहे. मंडळाकडून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मुलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. उत्सव काळात प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण संवर्धन व सामाजिक ऐक्य यासारख्या संदेशांवर भर दिला जात आहे.

फुलांची सजावट
रावेत परिसरातील मी रावेत डिस्ट्रिक फेज-एक सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी प्रथमच मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भजन संध्या, संगीत सुरांची मैफल, छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यान, रक्तदान शिबिर, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गौरव कुलकर्णी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष महेश ढगे, कार्याध्यक्ष रणजीत गंगे, सचिव सुहास लोंढे तसेच सर्व स्वयंसेवक यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रमाचे नियोजन योग्यरित्या पार पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com