महाशिवरात्रीनिमित्त निगडीत धार्मिक कार्यक्रम
निगडी, ता.१३ ः श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने निगडी प्राधिकरणातील श्री केदारेश्वर मंदिर प्रांगणात रविवारी (ता. १५) आणि सोमवारी (ता.१६) गंगाआरती, गंगाकलश स्नान यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी तीर्थक्षेत्र काशी विश्वेश्वर येथील विद्वान पंडित, महाराजांची विशेष उपस्थिती राहील. पहाटे रुद्राभिषेक, बागलकोट - कृष्णशिला इच्छाधारी नागधाम प्राणप्रतिष्ठापना, श्रीफळ जल अभिषेक, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार आहे. दुपारी पवनसुत भजनी मंडळ प्रस्तुत भक्तीभजन, स्वामी प्रतिष्ठान भजनी मंडळ प्रस्तुत स्वरभजन, दुपारी प्रसिद्ध शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाअंतर्गत लाठीकाठी आणि दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी कलारंजनी संगीत विद्यालय सत्यम् शिवम् सुंदरा हा भावगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहे. त्यानंतर रात्री स्थानिक कलाकार भक्ती संगीतमाला सादर करतील. रात्रभर महाशिवरात्र जागरण करण्यात येणार आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

