आकुर्डीतील भुयारी मार्गाचे काम संथगतीने

आकुर्डीतील भुयारी मार्गाचे काम संथगतीने

आकुर्डी, ता. ७ : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून गुरुद्वारा ते निगडी प्राधिकरणाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथे मागील १५ दिवसांपासून नाला आणि रस्त्याचे दुरुस्ती काम केले जात आहे. परंतु, हे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनचालकांना येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत असल्याचे दिसून आले.
पावसाचे आणि नाल्याचे पाणी जलनिस्सारण वाहिनीमधून एकत्रित नेण्यासाठी हे काम केले जात आहे. याशिवाय तेथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही अनेकदा कामे होऊन देखीलही पाणी साचून राहत असल्याचे
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
संथगतीने काम चालू असल्याने येण्या-जाण्यासाठी वाहनचालकांना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. पावसाळ्यात दरवर्षी प्राधिकरण आणि गुरुद्वाराच्या रस्त्याने खाली येणारे पाणी हे रेल्वे रूळाखालील भुयारी मार्गावर साचून राहत आहे.

भुयारी मार्गाजवळ कचरा कुंडी
या भुयारी मार्गावरील आजूबाजूच्या जागेवर स्थानिक लोकांकडून कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे, तेथील परिसरात सर्वत्र कचरा झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये घरगुती कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, कपड्यांचे गाठोडे इ. गोष्टींचा समावेश आहे. साचलेल्या पाण्यामुळे तसेच टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.

रस्त्याचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे, रहदारीस बंद केलेला रस्ता सुद्धा लोकांकडून पुन्हा चालू केला जात आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात कचऱ्याचे प्रमाण हे खूप वाढले आहे. लोक येथे घरगुती कचरा, दारूच्या बाटल्या, याचबरोबर मेलेल्या प्राण्यांचे शव देखील टाकत आहेत.
- साजेस शेख, स्थानिक दुकानदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com