निगडी, भक्ती- शक्ती बस स्थानकावर अपुऱ्या सुविधा
निगडी, ता. ७ ः निगडी, भक्ती-शक्ती या स्थानकांवरून अनेक बस पुणे आणि लोणावळ्याच्या दिशेने जात असतात. मात्र, अनेक ठिकाणच्या पीएमपीच्या बस थांब्यावर मूलभूत सुविधा नसल्याने निदर्शनास आले आहे. बहुतांश ठिकाणी बस थांब्यावर बसण्यासाठी आसनव्यवस्था, शेड, नाहीत तसेच, परिसरात कचऱ्याचे ढीग असतात. नागरिकांना व्यवस्थेअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
निगडीतील पवळे उड्डाण पुलासमोरच्या बस थांब्यावरून पुण्याला आणि लोणावळ्याला अनेक प्रवासी ये-जा करत असतात. येथील बस थांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था नसल्याने दिसते. त्यामुळे प्रवाशांचा गैरसोय होत आहे. तसेच, अनेकदा येथे प्रवाशांची गर्दी होत असते, त्यामुळे कधी चोरी तर कधी बसमध्ये चढताना दुखापत होण्याची शक्यता असल्याचे प्रवासी सांगतात. यामुळे बस स्थानकावर व्यवस्था करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
‘‘बस थांब्यावर नेहमीच गर्दी असते. कित्येकदा अनेक लोकांचे मोबाईल फोन, पर्सची चोरी झाली आहे. येथे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी, आसन व्यवस्था अपुरी आहे. बस थांब्यावर सावली आणि बसण्यासाठी जागा करावी.’’
- वैष्णवी कदम, पीएमपी प्रवासी, निगडी.
‘‘मी राहण्यासाठी निगडीत आहे. निगडी बस थांब्यावर बसण्यासाठी कुठे ही जागा नाही. शिवाय दिवसेंदिवस गर्दीही होत आहे. यामुळे चोरीचे प्रकार बस स्थानकावर वाढले आहेत.’’
प्रवासी, ज्येष्ठ नागरिक.
‘‘निगडीतील बस स्थानक उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. मात्र, जागा कमी आहे त्यावर विचार करण्यात येत आहे. या बस स्थानकावर प्रवासी संख्या जास्त असल्याने वाहतूक पोलिसांना आणि महापालिकेला देखील हा कल्पना देण्यात आली आहे.’’
सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

