
लक्ष्मण जगताप यांना पिंपळे सौदागरमध्ये श्रद्धांजली
पिंपळे सौदागर, ता. ४ : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपळे सौदागर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात बुधवारी (ता. ४) श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, आनंद हास्य क्लब राजेंद्रनाथ जयस्वाल, अल्कोवे सोसायटीचे अध्यक्ष विजय भांगरे, शरद दाऊतखानी, कल्पना बागूल, तात्या शिनगारे, मनोज ब्राम्हणकर, श्रीकृष्ण निलेगावकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
संजय भिसे म्हणाले, ‘‘शहराच्या जडणघडणीत लक्ष्मणभाऊ यांचे मोलाचे योगदान आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेसे वाटणारे असे व्यक्तिमत्त्व लक्ष्मणभाऊंच्या रूपाने आम्हाला लाभले, हे आम्ही भाग्य समजतो. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने, अतिशय लढाऊ, ध्येयवादी देवमाणूस म्हणून लक्ष्मणभाऊ सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी कधी निराश केले नाही.
असे मनमिळाऊ लक्ष्मणभाऊ आपल्यातून निघून गेल्यामुळे शहराचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.’’
फोटो ः 14864