नृसिंह हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंह हायस्कूलचे
स्नेहसंमेलन उत्साहात
नृसिंह हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

नृसिंह हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १८ ः मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सांगवी या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर उषा ढोरे, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग प्रमिला बर्गे, शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षा शीतल सोमवंशी, प्राचार्य अशोक संकपाळ, उपप्राचार्य रमेश घुमटकर आदी उपस्थित होते.

प्राचार्य अशोक संकपाळ यांनी अहवाल वाचन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक बक्षीसाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार सादर करून स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला. संजय खांदवे व राजश्री ढोरे यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव तळपे यांनी आभार मानले.

सांगवी ः नृसिंह हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करताना माजी महापौर उषा ढोरे, सांगवी पोलिस निरीक्षक सुनील टोणपे व इतर.
फोटो ः 14902